दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील ५६ पैकी केवळ दोन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ५४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
काल गुरूवारी (दि.६) कोरोना रुग्णांच्या संपर्कातील ५६ व्यक्तींची शहरातील कोवीड सेंटरमध्ये तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. यामध्ये शहरातील योगेश्वरी रूग्णालय व गोपाळवाडी येथील एक अशा दोन जणांना कोरोनाची लागण झाली. तर उर्वरीत ५४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, आज शहरात केवळ दोन रूग्ण सापडल्याने शहराला दिलासा मिळाला आहे तर तालुक्यातील ग्रामीण भागाचा अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत.










