उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘सीएनजी व्हॅट’ कपात निर्णयाचा टॅक्सी, ऑटो, प्रवासी वाहतूकदारांसह सामान्य नागरिकांना फायदा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर ‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी!
‘सीएनजी’वरील व्हॅट 13.5 ऐवजी आता 3 टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; 1 एप्रिलपासून नवे दर!
मुंबई : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील व्हॅट 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी करण्यात आला आहे. त्यामुळे आता एक एप्रिलपासून सीएनजी चे दर राज्यात कमी होणार आहेत. ( Deputy Chief Minister and State Economics Minister Ajit Pawar i.e. Arthasankalp Announcement Kelyapramane CNG Indhanavaril What 13.5 Tkkyavanrun 3 Tkke Itka Kami Karanyaat Aa Aahe. Thiamule comes aprilpasoon CNG che dar rajat kami honar hurt.)
सीएनजी वरील व्हॅट चा दर कमी करण्यात आल्याची अधिसूचना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार आहे. याचा फायदा ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसह प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे.
राज्यात या निर्णयामुळे प्रदूषण आणि यंत्रणा बरोबरच इंधनाच्या महागाईने होरपळलेल्या जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने सामान्यांसाठी हा फार मोठा दिलासा दिला असून 1 एप्रिल पासून सीएनजी दर कमी करण्यात येणार आहेत. हे नवे दर येत्या काही दिवसातच स्पष्ट होतील.