बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीतील जयदादा पाटील मित्र परिवाराने बाारामतीतील नगरपरीषदेच्या २०० सफाई कर्मचाऱ्यांना फेसशील्डची भेट दिली.
सफाई कर्मचारी सध्या कोविड योध्दे बनूनच काम करीत आहेत. कोरोनाच्या काळातही त्यांचे सफाईचे काम अविरतपणे सुरूच आहे. या सफाई कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेत जयदादा पाटील मित्र परिवाराने माजी उपनगराध्यक्ष जय पाटील यांच्या उपस्थितीत कामगारांना ही भेट दिली.
यावेळी आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे, सुभाष नारखेडे, राजेंद्र माने, सोमनाथ बेलदार, राहुल मदने, अमित मालुसरे, पवन शेजाळ आदी उपस्थित होते.











