दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील विविध भागात १३ ते ६० वयोगटातील ८ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. सकाळीच ग्रामीण भागात सहा रुग्ण आढळले होते. त्यामुळे आज दिवसभरातील रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे.
काल दौंड शहरातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील ४८ जणांची तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून नव्याने आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये पाच महिला व तीन पुरुष यांचा समावेश आहे. दौंड शहरातील शिवाजीनगर, फादर हायस्कूल, उपजिल्हा दौंड, बंगला साईड, भिमगर येथील प्रत्येकी एक, कुभांर गल्ली दोन आणि ग्रामीण भागातील सोनवडी येथे एक असे आठ नवे रूग्ण सापडले आहेत.
दरम्यान, दौंडमध्ये कोरोना आटोक्यात येत नसल्याचे चित्र असून आज दिवसभरात तालुक्याच्या ग्रामीण भागात सहा व शहरात आठ असे १४ नवे कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. मागील तीन दिवसात शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात तब्बल ८७ कोरोना बाधित रूग्ण वाढले आहेत.










