इंदापूर : महान्युज लाईव्ह
आज इंदापूर तालुक्यातील सुरवड येथे तीन जण नव्याने कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
इंदापूर तालुक्यातील दोन जणांनी काल बारामती येथे कोरोना ची तपासणी केली होती. आज अकलूज येथे तपासणी केलेल्या एकाच कुटुंबातील तिघाजणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या तिघांवर अकलूज येथे उपचार सुरू आहेत. यामध्ये 70 वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीसह त्यांची 64 वर्षीय पत्नी व 52 वर्षीय भाऊ यांचा समावेश आहे.
दरम्यान काल इंदापूर येथे एका दिवसात सोळा जणांची कोरोना ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आजही तालुक्यातील कोरोना ची लागण सुरू राहिली.










