इंदापूर : महान्युज लाईव्ह
इंदापुर मध्ये एकाच दिवशी 15 कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील निकटचे संशयितांची नमुने तपासले असता आज तालुक्याच्या विविध भागांमध्ये मिळून तब्बल 14 कोरोना ग्रस्त आढळून आले आहेत.
इंदापूर मध्ये 61 जणांचे घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी पैकी 14 जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यामध्ये इंदापूर शहरांमधील चार, कळंब येथील एक, निमगाव केतकी येथे 3 व वरकुटे येथे तब्बल पाच व अकोले येथे पुन्हा एक रुग्ण आढळून आला आहे. इंदापूरमध्ये ही चिंतेची बाब आहे.
इंदापुरमध्ये गेल्या तीन दिवसापासून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे संपूर्ण इंदापूर तालुका चिंतेच्या खाईत असून आता इंदापुर मध्ये लोकडाऊन करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण प्रत्येक गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळूू लागले आहेत.











