बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती बुधवार दि.१२ जानेवारी रोजी जिजाऊ भवन येथे साजरी करण्यात आली.
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांच्या शुभहस्ते बाल शिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जिजाऊ सेवा संघाच्या वतीने जिजाऊ वंदना साजरी करण्यात आली व बारामती सहकारी बँकेच्या चेअरमन पदी सचिन सातव व संचालक पदी विजय गालीदे, आदेश वडुजकर,शिरीष कुलकर्णी,,नामदेवराव तुपे,देवेंद्र शिर्के आदी ची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सेवा संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका या विविध उपक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले. जिजाऊ सेवा संघाच्या वतीने स्वागत व आभार प्रदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले