दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील केडगाव येथे नऊ वर्षाच्या मुलीसह पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक रासगे यांनी ही माहिती दिली. केडगावच्या कोरोना बाधीताच्या संपर्कातील ४० जणांची कोरोना विषाणू ची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल आज आला. त्यामध्ये एक नऊ वर्षाची मुलगी, दोन महिला व दोन पुरुष यांचा समावेश आहे, हे सर्व केडगाव हद्दीत एका पत्राच्या कंपनीत काम करणारे मजुर आहेत. दरम्यान दौंड शहरात वाढ होत होती, त्याचबरोबर तालुक्यातील ग्रामीण भागातही आता कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून तो आटोक्याबाहेर चालला आहे.











