दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे काल सापडलेल्या भागवत वाडी परिसरातील एका वाहनचालकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर आता या चालकांच्या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर चौफुला येथेही कोरोनाने शिरकाव केला असून येथे एकास कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
पाटसमधील दोन प्रसिद्ध डॉक्टर दांपत्यांनी २३ जूनला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पाटसमध्ये कोरोना रुग्ण सापडण्याचे सत्र थांबत नसून पाटसमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. काल भागवतवाडी परिसरातील एका वाहनचालकास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंब व संपर्कातील १३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी एकास कोरोनाची लागण झाली असून उर्वरित १२ जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सध्या पाटसमध्ये सात कोरोना बाधितांची संख्या झाली असून यापैकी दोन जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच चौफुला येथे एकास कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील विविध भागातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील इतर अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही डॉ. रासगे यांनी सांगितले.










