
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
लाकडीच्या कोरोनाग्रस्ताने उपचार घेतल्याने भवानीनगर मधील लोक चिंतेत होते, मात्र येथील डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने भवानीनगरसह आसपासच्या 16 गावांना दिलासा मिळाला आहे.
भवानीनगर येथील प्रसिध्द डॉक्टरांकडे अर्धा तास उपचार घेतल्यानंतर त्यास लागलीच बारामती येथे जाण्याचा सल्ला दिला होता, मात्र हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी स्वतःहून दवाखाना बंद करीत त्याच क्षणी स्वतःसह इतरांचे नमुने तपासणीसाठी दिले. त्याचा अहवाल रात्री उशीरा आला, त्यामध्ये डॉक्टरांसह दवाखान्यातील सर्व कर्मचारी निगेटिव्ह आले आहेत. यामुळे भवानीनगर नव्हे तर आसपासच्या आणि गावातील लोकांनाही दिलासा मिळाला आहे, कारण भवानीनगर मधील हा दवाखाना आसपासच्या सोळा गावातील गोरगरीब रूग्णांसाठी दिलाशाचे स्थान आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन सुरू असताना शहरी भागातील डॉक्टर्स आपले दवाखाने बंद ठेवून घरीच थांबले असताना हे ग्रामीण भागातील डॉक्टर आपला दवाखाना सदैव ठेवून लोकांची सेवा करीत होते, त्यामुळे त्यांच्या दवाखान्यात कोरोनाग्रस्ताने उपचार घेतल्यानंतर लोकांची चिंता वाढली होती, ती अशासाठी की, हा दवाखाना बंद झाला, काही काळ बंद राहिला, तर आपण उपचारास जायचे कुठे?
तू चाल पुढं तुला रं गड्या
आज कोरोनाचा अहवाल आल्यानंतर सकाळपासून संबंधित डॉक्टरांना मित्र, हितचिंतक यासह रुग्णांचेही दूरध्वनी आले आणि त्यांनी डॉक्टरांना केवळ पाठबळ दिले नाही, तर या पुढील काळात अनेक काळात अनेक कोरोनाग्रस्त दवाखान्यांमध्ये ग्रामीण भागात उपचार घेण्यात येतील, त्यामुळे आजवर जी सेवा देत आलात, तीच सेवा यापुढे कायम चालू ठेवा अशा स्वरूपाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.











डॉ साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत
आणी पत्रकार रायते साहेब आपणही कोरोना योद्धा प्रमाणे काम करताय आपलेही आभार