पुण्यातूनच कोरोनाची लागण
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील बावडा येथील गणेशवाडी येथील मूळच्या परंतू पुण्यात कामास असलेल्या कामगारास कोरोनाची बाधा झाली आहे.
हा कामगार 22 जून रोजी गणेशवाडी येथे आला, मात्र त्यास क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यास कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र आरोग्य प्रशासनाने त्याची कोरोना चाचणी घेतली, त्यामध्ये ही चाचणी पाँझिटिव्ह आली अशी माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.
हा रुग्ण येतेवेळीच त्यास कोरोनाची बाधा झाली असावी असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. हा कामगार पुण्यातील बजाज कंपनीत नोकरीस असून तेथून तो मूळ गावी 22 जून रोजी आला होता.











