• Contact us
  • About us
Sunday, October 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाहू महाराजांनी सर्वसामान्य माणसांपर्यंत शिक्षण पोचवले : रत्नाकर मखरे

Maha News Live by Maha News Live
June 26, 2020
in ताज्या बातम्या
0

भिमाई आश्रमशाळेत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी   

इंदापूर  : महान्यूज लाईव्ह 

 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाला पर्याय नाही हे अचूकपणे जाणले. त्यामधूनच शिक्षण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी धोरणे आखून अंमलात आणली, असे मत माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी व्यक्त केले. 
इंदापूर येथील भिमाई आश्रमशाळेत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस इंदापूरचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे व संचालिका शकुंतला मखरे यांनी  शिफा मुल्ला या विद्यार्थिनीसमवेत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मखरे म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राचा उल्लेख आला की एका नावाचा हमखास उल्लेख होतो, ते नाव म्हणजे छत्रपती शाहू महाराज! बहुजनांची परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण  बहुजन बांधवांसाठी खुले केले. समाजातील शोषित व मागास वर्गाला आरक्षण देण्याची कल्पना सर्वप्रथम जर कुणी मांडली असेल तर ती शाहू महाराजांनी मांडली. समाजातील विषमता, भेदाभेद नष्ट करण्याच्या प्रयत्नांमध्ये त्यांना तत्कालीन उच्चवर्णीयांचा कडवा विरोध सहन करावा लागला, पण त्यांनी ह्या विरोधाला न जुमानता आपले कार्य पूर्णत्वास नेले. आज मागास, दलित, बहुजनांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारली ह्याचे मुख्य कारण छत्रपती शाहू महाराजांचे कठोर प्रयत्न, त्यांनी आखलेल्या योजना आणि त्या पूर्णत्वास नेल्या. रयतेचा राजा अशी पदवी रयतेनेच बहाल करावी ह्यातच शाहू महाराजांची महानता व त्यांनी लोक कल्याणासाठी केलेले कार्य यामुळे बहुजनांच्या मनात त्यांना मिळालेले मानाचे स्थान याची कल्पना येते. आजपर्यंत भारतात अनेक समाजसुधारक होऊन गेले, परंतु राजर्षी शाहू महाराजांचे वेगळेपण असे की, त्यांनी बहुजनांची केवळ सामाजिक परिस्थिती सुधारण्याकडेच लक्ष न देता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याची प्रत्यक्ष तरतूद केली.  शिक्षणानंतर बहुजन वर्गाच्या रोजगाराचीही सोय व्हावी तो आर्थिक दृष्ट्यासुद्धा सक्षम व्हावा यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्याची संकल्पना त्यांनीच मांडली व म्हणूनच त्यांना आरक्षणाचे जनक म्हटले जाते. महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. त्यांनी असा आदेशच जारी केला कि सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण घ्यावेच लागेल अन्यथा दंड ठोठावण्यात येईल. शाहू महाराज केवळ आदेश देऊन स्वस्थ बसले नाही तर आपल्या आदेशाची अंमलबजावणी कशाप्रकारे होते त्याची संपूर्ण माहिती नियमितपणे त्यांना मिळावी अशीही व्यवस्था त्यांनी केली होती. यातून त्यांची सर्वसामान्य रयतेप्रती असलेली तळमळ दिसून येते व छत्रपती शाहू महाराजांना लोक रयतेचा राजा का म्हणत हे सुद्धा समजून येते.
 या कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे , सामाजिक कार्यकर्ते गोरख तिकोटे व सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Next Post

धनगर समाजाविषयी आक्षेपार्ह विधान फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group