दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड मध्ये एका व्यक्तीला कोरोना ची लागण झाल्याचा खासगी लॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डाॅ. तुकाराम बनसोडे यांनी दिली.
संबंधित व्यक्ती पुणे महानगरपालिकेचा कर्मचारी असून रोज पुण्यावरून ये जा करीत आहे. या व्यक्तीस त्रास होवू लागल्याने खासगी लॅबमध्ये कोरोनाची तपासणी केली असता अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे, दरम्यान, दौंडच्या ग्रामीण भागात खुटबाव, केडगाव,बोरीपार्धी,व पाटस नंतर आता वरवंड मध्ये कोरोनाचा रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, हा खासगी लॅबचा रिपोर्ट असून त्याची शासकीय लॅबमध्येही कोरोनाची तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अशोक रासगे यांनी दिली.










