• Contact us
  • About us
Sunday, October 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छत्रपती कारखान्यात आगामी काळात घडू शकते सत्तेचे हस्तांतर?

Maha News Live by Maha News Live
June 22, 2020
in शेती शिवार, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष
0

इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर व बारामतीच्या राजकारणात व अर्थकारणात बदल घडवणाऱ्या छत्रपती कारखान्यात सध्या बरेच काही शिजते आहे. येत्या काही दिवसांत छत्रपती कारखान्यातील सत्तेचे हस्तांतर होऊन सत्तेची सूत्रे पृथ्वीराज जाचक यांच्याकडे येऊ शकतात, तशा संदर्भातील चर्चा सध्या सुरू असून हे प्रत्यक्षात साकार झाल्यास राजकारणाच्या गोळाबेरजेबरोबरच सोमेश्वरप्रमाणेच छत्रपतीही कूस बदलेल असेच संकेत मिळत आहेत.


छत्रपती कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत सध्या कार्यक्षेत्रातील सभासदांमध्ये चिंतेचा सूर आहे, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार देखील   माळेगाव कारखान्याच्या निवडणूकीत हीच चिंता स्पष्टपणे व्यक्त केली होती. विद्यमान अध्यक्ष प्रशांत काटे व सहकारी संचालकांनी काटकसरीने कारखाना चालवला, अर्थात ऊस तोड मजूर कमी आल्याने हंगामातील अडचणी आल्या हेही त्यांनी स्पष्ट केले होते, मात्र त्याचबरोबर त्यांनी हा कारखाना पुन्हा पूर्वपदावर आणणार असल्याचे खात्रीने सांगितले होते. हा कारखाना माझा असून, हा कारखाना कसा उभारीला आणायचा व त्याला वैभव मिळवून द्यायचे याची आखणी मी केलेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.


सध्या अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा कामाचा व्यापही मोठा आहे, त्यामुळे या परिस्थितीत हा कारखाना याच हंगामात पूर्ण क्षमतेने गाळप करेल यासाठी अनुभवी प्रशासकाची निवड करण्यावर गांभिर्याने चर्चा सुरू आहे. दुसरीकडे गेली काही वर्षे सातत्याने विरोधात असलेल्या पथ्वीराज जाचक यांच्यावर सभासदांचा विश्वास असला तरी त्यांच्या हातात राजकीय सत्ता मात्र येत नाही, तीन निवडणूकांमध्ये सलगपणे यशाने हुलकावणी दिली आहे. सत्तेच्या व निवडणूकीच्या राजकारणात अजित पवार काहीही करून विजयश्री खेचून आणू शकतात हा सर्वांनाच विश्वास आहे. त्यामुळेच या कारखान्याच्या बाबतीत राजकीय जोडे बाजूला ठेवून तळमळीने विचार करण्याची गरज दोन्ही बाजूंसाठी महत्वाची आहे.  त्यातूनच हा एक सहकारातील नवा पायंडा पाडला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


छत्रपती कारखान्याची सूत्रे  गेल्या काही वर्षांपासून विरोधात असलेल्या पृथ्वीराज जाचक यांच्याकडे सोपविण्याची चर्चा सुरू असून यासाठी बारामतीमधूनच आशेचा अमोल किरण दिसू लागला आहे. सध्या कार्यक्षेत्रात याचीच चर्चा सुरू आहे. अद्याप उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे किंवा अगदी खुद्द पृथ्वीराज जाचक यांनीही काहीही मत अथवा प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही, मात्र यासंदर्भात प्राथमिक स्तरावरील काही बैठका झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.


दुसरीकडे येणारा हंगाम जिकीरीचा आहे, त्याचबरोबर हा हंगाम पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचे आव्हानही आहे. मागील हंगामात पुरेशी तयारी असूनही ऊस तोड मजूर पुरेशा संख्येने नसल्याने हंगामात अडचणी आल्या, सध्या कारखान्यावर सहवीजनिर्मिती व विस्तारीकरणाचे कर्जही आहे, या साऱ्या स्थितीचा परिणाम ऊसदरावर होऊ लागला असल्याने कारखान्यात सत्तेचे हस्तांतर करून एक नवा इतिहास जन्माला घालण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. तसेही कोरोनाच्या काळात कारखान्याच्या निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या आहेत, अजूनही पुढे ढकलल्या जातील. मात्र निवडणूकीने कारखाना बेजार करण्याऐवजी सकारात्मक राजकारणाची नवी गोळाबेरीज कारखान्यासाठी शुभवर्तमान ठरू शकते.

पाठीमागे असेच विरोधात असलेल्या अमरसिंह घोलप यांना अचानकपणे राष्ट्रवादीत आणून त्यांना कारखान्यावर संचालकपदी नेमून त्यांच्याकडे कारखान्याची धुरा देण्यात आली होती. तसाच काहीसा प्रयोग यावेळीही केला जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता उदयास आल्यास पवारांचे बेरजेचे राजकारण सहकाराच्या चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी काळानुसार कायम असल्याचाही संदेश जाणार आहे. त्याचबरोबर छत्रपती कारखान्याचा सशक्त प्रवासही होण्याची शक्यता अधिक खात्रीशीर होणार आहे. या निर्णयाचे तात्कालीक परिणाम राजकीय वाटतील, मात्र कारखान्याच्या प्रकृतीसाठी हे परिणाम दिर्घकालीन दृष्ट्या महत्वाचे व फायदेशीर ठरू शकतात. जाचक यांना राजकीय निवडणूकीत अपयश आले असले तरी कारखान्याचा त्यांचा तौलनिक अभ्यास, प्रशासन कौशल्याची सर्वांनाच जाण आहे. जाचक यांनाही कारखान्याची स्थिती सुधारण्याची तळमळ आहे, या सर्वांचा एकोपा करून हे नवे समीकरण उदयास येऊ शकते अशी सध्या गृहीतके बांधली जात आहेत. छत्रपती कारखान्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासह पृथ्वीराज जाचक यांनीही ही नवी संकल्पना स्विकारल्यास इंदापूरच्या अर्थकारणातही नवे बदल होऊ शकतात. जाचक यांच्याकडेही काही जादूची कांडी असेल असे नाही, मात्र कुशल नेतृत्व ते नक्कीच कारखान्याला देऊ शकतात ही भावना आजही सभासदांमध्ये आहे. फक्त जाचक यांनीही दोन पावले मागे येऊन कारखान्याच्या हितासाठी अशा नव्या पर्यायांचा स्विकार करायला हवा व अजित पवार यांनीही ही नवी बेरजेची सहकारातील पध्दत रुजू करावी, तो राज्याच्या सहकाराचा नवा अध्याय असेल.

Tags: BaramatiChatrapati Sugar FactoryDCM Ajit PawarIndapurPrithviraj Jachak
Next Post

धक्कादायक..! केडगावच्या डॉक्टरच्या कुटुंबातील तिघांना कोरोना..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group