सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याचे औचित्य साधून इंदापूर तालुक्यात मंगळवारी (19 ऑक्टोबर) किंवा आठवड्यात एक हजार वस्तू गरीब व गरजू लोकांना दान करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.अशी माहिती इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिली.
शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त कोणतीही एक वस्तू दान केली जाणार आहे. त्यामध्ये एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दिवाळीनिमित्त गरजूंना 1000 धान्याचे कीट, कपडे इत्यादी आपल्या कुवतीनुसार गरीब व गरजू लोकांना दान केली जाईल.
हनुमंत कोकाटे व अतुल झगडे यांनी याबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवनातील हा व्यक्तिगत प्रवास हा कुटुंबातील सर्वच सदस्यांना आनंद देणारा, उत्साह वाढवणारा आहे. त्याचप्रमाणे सर्व समाजाला महाराष्ट्राला भारत देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार साहेबांचे कुटुंब आहे. पवार साहेबांच्या जीवनातील हा आनंदाचा सण हे गणित करून शरद पवार यांचे अभिष्टचिंतन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.