पुण्यातील रुबी हॉल मध्ये 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
इंदापूर : महान्युज लाईव्ह
इंदापुरात 1 जून रोजी आढळलेल्या कोरोनाग्रस्त निवृत्त महसूल कर्मचाऱ्याचा पुण्यामध्ये कोरोना वरील उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा इंदापूर शहरातील पहिला कोरोनाचा रूग्ण होता व या रुग्णाचा सोलापुरातील कोरोना रुग्णाशी संपर्क आला होता.
पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाची यापूर्वी एक जून रोजी कोरोनाची चाचणी घेतली होती, तेव्हा ती निगेटिव्ह आली होती, मात्र 5 जून रोजी पुन्हा कोरोनाची दुसरी चाचणी घेतल्यानंतर ती पॉझिटिव्ह आल्याने पुण्यातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा अंत्यविधीही पुण्यातच केला जाणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.
दरम्यान यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या इंदापूर तालुक्यात 2 वर पोहोचली आहे. त्यापूर्वी भिगवण रेल्वे स्टेशन येथील 63 वर्षे महिलेचा 30 एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान या कोरोना पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे अहवाल संध्याकाळपर्यंत येतील अशी माहिती डॉ. चंदनशिवे यांनी दिली.
मृत व्यक्ति ही इंदापूर तालुक्यातील महसूल कर्मचारी होती महसूल सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मागील दोन महिन्यापासून सोलापूर शहरात वास्तव्यास होती. त्यांना इतरही आजार होते. 31 मे रोजी पुढील उपचारासाठी ते पुणे येथे जाणार होते. मात्र 31 मे रोजी इंदापूरात मुक्काम केल्याने संपर्कातील इतरांची चाचणी करण्यात आली आहे.










