राज्य शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत १२० बाटल्या रक्त संकलन
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने रक्तदानाच्या केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत इंदापुर शहरातील मुस्लिम युवकांनी रक्तदान शिबिर भरवले आणि त्यास युवकांनी मोठा प्रतिसाद देत १२० बाटल्या रक्तसंकलन केले.
सुफियानखान जमादार मिञपरिवाराच्या वतीने संत रोहिदास मंदिर येथे हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्ताञय भरणे यांनीही या शिबीरास उपस्थित राहून रक्तदात्यांचे कौतुक केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या शिबीराचे उदघाटन केले. माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेण्यात आले. सोलापूर येथील मेडिकेअर रक्तपेढीने हे रक्तसंकलन केले.
या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, शहराध्यक्ष अनिल राऊत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत, माजी उपनगराध्य धनंजय बाब्रस, वसंतराव माळुंजकर, प्रा. अशोक मखरे, दादासाहेब सोनवणे, बाळासाहेब ढवळे, इम्रानभाई शेख, ॲड. असिफ बागवान, अहमदरजा सय्यद, शिवसेना शहराध्यक्ष महादेव सोमवंशी, ऋषिकेश ननवरे, बाळासाहेब कांबळे, सुरेश सोनवणे, राजु शेवाळे, रफिक बागवान, महेबुब मोमीन, चमनभाई बागवान, अरिफभाई जमादार, प्रशांत उंबरे आदी उपस्थित होते.
आशपाक शेख, परवेज़ शेख, अयन शेख, अन्निस शेख, इरफान सय्यद, आयान जमादार, अमन जमादार, शोएब सय्यद, आलीम सय्यद, अमजत शेख, इरशाद शेख, राजकुमार पवार, सर्फराज मणेरी, समिर मोमीन, लोहाज मणेरी, मोहसिन मणेरी, गोट्या शेख यांनी या शिबीराचे नियोजन केले.










