एमआयडीसी ला दिलासा, कोरोनाबाधीताच्या संपर्कातील होते सर्वजण
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कुरकु़ंभ ओद्योगिक वसाहतीमध्ये सापडलेल्या कोरोनाबाधीत रूग्णाच्या संपर्कातील सात जणांचा अहवाल आज निगेटिव्ह आला.
दौंडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी ही माहिती दिली. यामुळे दौंड तालुक्याला दिलासा मिळाला आहे. मुंबई येथील अंबरनाथ येथून कोरोना बाधीत व्यक्ति कुरकु़ंभ ओद्योगिक वसाहती येथे २५ मे रोजी कामानिमित्त आली होती. मात्र त्यास त्रास होऊ लागल्याने त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. खासगी प्रयोगशाळेतील केलेल्या या तपासणीचा अहवाल ३० मे रोजी आला. यामध्ये हा कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने औद्योगिक वसाहतीत खळबळ उडाली होती. त्यानंतर या कामगाराच्या संपर्कातील सात जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने प्रशासनाने घेतले व कोरोना तपासणीसाठी पाठवले. त्यांचा अहवाल आज प्रशासनास मिळाला असून हे सातही जण कोरोना निगेटिव्ह आले आहेत.










