दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरात आज नेहरूचौक येथील नव्वद वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला. मात्र दुसरीकडे आजच्याच दिवशी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत नव्याने कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे दौंडला हादरा बसला आहे.
आज दौंडमध्ये दुसरा बळी कोरोनाने घेतला ही बातमी ताजी असतानाच कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतही कोरोनाचा रुग्ण सापडल्याने सुरळीत होत असलेल्या कुरकुंभ औद्योगिक वसाहतीलाही धक्का बसला. औद्योगिक वसाहतीत आढळलेला हा कोरोनाचा रुग्ण मुंबई -अंबरनाथ प्रवासाशी संबंधित असून तेथून आलेल्या एका कामगाराला कोरोनाची बाधा झाल्याचे आज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी सांगितले.










