बारामती : महान्यूज लाईव्ह
महाभयंकर कोरोनो रोगाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेला आहे. महाराष्ट्र शासनामार्फत देखील महाराष्ट्रातील जनतेला रक्तदान करण्याचे आव्हान केले जात आहे. बारामती शहरात देखील रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.याच पार्श्वभूमीवर बारामती उद्योग समूह व योद्धा प्रॉडक्शन मार्फत शनिवार दिनांक ३० मे व रविवार दिनांक ३१ मे २०२० रोजी गिरीजा ब्लड बँक बारामती येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यासाठी सहकार्य करणार असून गिरीजा ब्लड बँक येथे शनिवार आणि रविवारी सकाळी १० वाजल्यापासून रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे. यावेळी सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टनसिंग या सर्व बाबींचे पालन करण्यात येणार आहे. यासाठी बारामती शहर आणि परिसरातील रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवून या अमूल्य कार्याला सहकार्य करावे असे आवाहन बारामती उद्योग समूह, योद्धा प्रॉडक्शन व श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत करण्यात आले आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी आपल्या वेळेनुसार नावनोंदणी करुन गिरीजा ब्लड बँक येथे रक्तदानासाठी उपस्थित रहावे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी 9960997579, 9763196197 किंवा 8007663664 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










