मुंबईहून वडगाव निंबाळकरला आलेल्या महिलेला कोरोनाची लागण..
बारामती : महान्यूज लाईव्ह
मुलीला भेटण्यासाठी मुंबईवरून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे आलेल्या ज्येष्ठ महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बारामती आज कोरोनाच्या बाबतीत बारा रुग्णांवर जाऊन पोचली.
गेल्या चार-पाच दिवसात मुंबई-पुणे येथून अनेक लोक बारामती इंदापूर इंदापुरात येत आहेत आणि त्यांच्यामुळे कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. ही चिंता जास्त सतावत असतानाच काल मूर्टी येथे एक कोरोनाचा रुग्ण आढळला, तर आज वडगाव निंबाळकर परिसरातील एका ज्येष्ठ महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
या महिलेला त्रास होत असल्याने हवापालटासाठी म्हणून ती वडगाव निंबाळकर येथे आली होती. परंतु इकडेही त्रास जाणवू लागल्याने तिला पुण्यातील ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यामध्ये तिला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बारामती तालुक्यात मुंबईतून आलेले हे सलग दुसरे रुग्ण आहे. त्यामुळे मुंबईहून पाहुणे नाही तर कोरोनाचे जणू बॉम्ब ग्रामीण भागात येत आहेत अशा स्वरूपाची चर्चा ग्रामीण भागात सुरू झाली आहे.
गेल्या पाच दिवसांमध्ये बारामती इंदापुरात संवाद दोन हजार लोक कोरोनाबाधित क्षेत्रातून आलेले आहेत. यामध्ये इंदापूर तालुक्यात 849, तर बारामती तालुक्यात बाराशे लोकांची नोंद आहे.











