दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे एका सात वर्षाच्या मुलासह आईचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. आपल्या सातवर्षाच्या भावाला आणि आईला गळपास घेतल्या अवस्थेत दहा वर्षाच्या चिमकुलीने हा पाहिल्यानंतर हा प्रकार समजला. दरम्यान, या महिलेच्या पतीकडील नातेवाईकांनी मात्र आत्महत्या नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केली आहे. पोलीसांनी या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी या नातेवाईकांनी केली आहे.
लिना सचिन सोनवणे (वय 35 ) कुमार ओम सचिन सोनवणे (वय 7, दोघेही स्वराज व्हॅली अपार्टमेंट रा. पाटस ता.दौंड जि.पुणे ) असे या आई आणि मुलाचे नाव आहे. मंगळवारी ( दि. 27 ) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ( नेमकी वेळ माहिती नाही ). याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, लिना सोनवणे ही तिचा मुलगा ओम आणि दहा वर्षाची मुलगी कुमारी वैष्णवी हे स्वराज व्हॅली अपारमेंट दुसरा मजल प्लॉट नंबर 9 याठिकाणी राहत होते.
मंगळवारी कुमारी वैष्णवी ही सकाळी झोपेतून उठली असता तिला तिच्या खोलीत तिचा भाऊ ओम हा ओढणीने पंख्याला लटकलेला मृत्युदेह गळफास घेतलेल्या आवस्थेत दिसला, तर ती किचन रूममध्ये गेली असता आई देखील दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिने प्रकार फोन वरून तिचे वडील, आजी आजोबा यांना सांगितला.
याबाबत लिना हिचा भाऊ भाऊसाहेब मारुती शेलार (रा.केडगावता.दौंड,जि.पुणे) यांनी पाटस पोलिस चौकीत खबर दिली. घटनेची माहिती मिळताच दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन नागगोजे, पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे, सहाय्यक फौजदार सागर चव्हाण, पोलीस हवालदार प्रदीप काळे, विजय भापकर यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, लिना हीने मुलास मारून स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. तर या आत्महत्येबाबत या महिलेच्या सासरच्या नातेवाईकांनी शंका उपस्थित केली असून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. पोलीसांनी याप्रकाराचा सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे म्हणाले की, सदर मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही आणि तपास केला जाईल.