इंदापूर तालुक्यात काल शिक्षकांसहित 369 जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या. मात्र यापैकी कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांमधील तपासणीत 32 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. काल आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये इंदापूर तालुक्यातील सणसर मधील तब्बल 10 जणांचा समावेश आहे. सणसर हे इंदापूर व बारामती तालुक्याच्या वेशीवर असल्याकारणाने आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे.
काल इंदापूर तालुक्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर येथील चाळीस वर्षीय पुरुष, 69 वर्षीय निवृत्त शिक्षक, रायतेमळा येथील 70 वर्षीय पुरुष, भवानीनगर येथील 31 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, सणसर येथील 50 वर्षीय पुरुष रुग्ण आढळून आले आहेत.
भिगवण येथील 35 वर्षीय पुरुष अंथुर्णे येथील 55 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, पिंपरी खुर्द येथील 29 वर्षीय पुरुष, इंदापूर येथे उपचार घेत असलेली वीस वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 41 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, दोन वर्षीय मुलगा, 36 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
तरंगवाडी येथील वीस वर्षीय पुरुष, माळवाडी नंबर 2 येथील 50 वर्षीय पुरुष, भिगवण येथील 47 वर्षीय पुरुष, तक्रारवाडी येथील 37 वर्षीय महिला, सात वर्षीय मुलगा, बोरी येथील 56 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, काटी येथील 60 वर्षीय महिला, सराफवाडी येथील 55 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीत झालेल्या विविध तपासण्यांमध्ये देखील इंदापुरातील रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सणसर येथील 60 वर्षीय महिला 13 वर्षीय मुलगी, 38 वर्षीय पुरुष, 76 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे










