बारामती : महान्यूज लाईव्ह
उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाशी डॉक्टरने लज्जास्पद वर्तन केल्याची ही घटना बारामती शहरातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात घडली. मासिक पाळीदरम्यान पोटात तीव्र कळा येत असल्याने पीडित महिला १९ ऑक्टोबर रोजी आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन या हॉस्पिटलमध्ये गेली होती.
व्हॉट्सॲपवर झालेल्या संभाषणात डॉक्टरांनी स्वतःच्या चुकीची कबुली देत दिलगिरी व्यक्त केल्याचा दावा फिर्यादी महिलेने केला आहे. घटनेनंतर दसऱ्याच्या निमित्ताने संबंधित डॉक्टरांनी महिलेला शुभेच्छांचा मेसेज पाठवला होता. त्यावर महिलेने त्या दिवशी दवाखान्यात केलेल्या आक्षेपार्ह वर्तणुकीबद्दल थेट विचारणा केली असता, ‘पुन्हा अशी चूक होणार नाही’ असा मेसेज डॉक्टरांनी पाठवला.
अखेर नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेला पती घरी परतल्यानंतर महिलेने संपूर्ण आपबिती मांडली आणि शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी डॉ. राधेय खलाटे याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास हाती घेतला आहे.
तपासणीदरम्यान व्यायाम करून दाखवण्याच्या बहाण्याने डॉक्टरांनी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. पाठीचा व्यायाम सुरू असताना महिला अस्वस्थ झाली आणि तिने डॉक्टरांना लांब राहण्याची विनंती केली. मात्र, तरीही अंतर न ठेवता डॉक्टरांनी पाठीमागून कमरेला स्पर्श केला आणि छातीत धडधड होत असल्याबाबत विचारणा केली. या धक्कादायक प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने पुढील उपचार तत्काळ नाकारत फक्त औषधे लिहून देण्याची मागणी केली आणि ती थेट हॉस्पिटलमधून बाहेर पडली.
उपचारासाठी आलेल्या रुग्णाशी लज्जास्पद वर्तन केल्याची ही घटना बारामती शहरातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात घडली. मासिक पाळीदरम्यान पोटात तीव्र कळा येत असल्याने पीडित महिला १९ ऑक्टोबर रोजी आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन या हॉस्पिटलमध्ये गेली होती. प्राथमिक उपचाराचा भाग म्हणून सलाईन दिल्यानंतर डॉक्टरांनी तिला पुढील तपासणीसाठी केबिनमध्ये बोलावले होते. तिथेच वैद्यकीय तपासणीच्या आडून हा संपूर्ण गैरप्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.










