• Contact us
  • About us
Saturday, October 24, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एचआयव्हीमुक्तीकडे महाराष्ट्राची वाटचाल!

mahaanewslive by mahaanewslive
October 22, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, Featured
0
एचआयव्हीमुक्तीकडे महाराष्ट्राची वाटचाल!

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

मुंबई : राज्यातील एचआयव्ही प्रतिबंध, चाचणी, उपचार आणि काळजी सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा’ (एमएएस) उपक्रमांतर्गत महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर आणि सांगली या ६ जिल्ह्यांनी तिन्ही निकष पूर्ण करत ‘सुरक्षित’ श्रेणीत, तर २३ जिल्ह्यांनी दोन निकष साध्य करून ‘सक्षम’ श्रेणीत प्रवेश मिळवला आहे.

या मोहिमेतील कामगिरीबद्दल आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी आणि सर्व भागीदार संस्थांचे अभिनंदन केले असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांनी निर्धारित मुदतीत उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अधिक सक्रियपणे काम करावे, असे आवाहन केले आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या (नॅको) मार्गदर्शनाखाली राज्यात ७ एप्रिल २०२६ पासून हा उपक्रम राबविला जात आहे.

या मोहिमेअंतर्गत एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या संसर्गस्थितीची माहिती असणे, निदान झालेल्या सर्व व्यक्तींना नियमित अँटिरेट्रोव्हायरल उपचार (एआरटी) मिळणे आणि उपचार घेणाऱ्या व्यक्तींचा विषाणुभार नियंत्रणात येणे, या ‘९५:९५:९५’ या जागतिक उद्दिष्टांवर भर दिला जात आहे.  या तिन्ही उद्दिष्टांसोबतच एचआयव्ही, सिफिलिस आणि हिपॅटायटिस-बीचा संसर्ग मातेकडून बाळाला होण्याचे प्रमाण शून्यावर आणणाऱ्या जिल्ह्याला ‘सुरक्षित+’ श्रेणी दिली जाते.

हे यश साध्य करण्यासाठी एचआयव्हीचे लवकरात लवकर निदान करणे, बाधितांना चाचणी व उपचार सेवांशी जोडणे, औषधोपचारांमधील खंड पूर्णपणे टाळणे, नियमित विषाणुभार चाचण्या आणि सातत्यपूर्ण समुपदेशन या पंचसूत्रीवर भर दिला जात आहे. आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, एआरटी केंद्रे, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि सामाजिक भागीदार संस्थांच्या प्रभावी समन्वयातून ही प्रगती शक्य झाली आहे.

​येत्या १ डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘९५:९५:९५’ हे उद्दिष्ट साध्य करण्याचे निश्चित ध्येय प्रशासनाने ठेवले आहे. वेळेत निदान, सातत्यपूर्ण उपचार आणि समाजातील सजगतेतून एड्स नियंत्रणासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे शहरी आरोग्य आयुक्त तथा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group