दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड च्या ग्रामीण भागातील स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर च्या प्राप्त झालेल्या अहवालात ४० पैकी १२ जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक रासगे यांनी ही माहिती दिली. कोरोना बाधीत व्यक्तिंच्या संपर्कातील ४० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली.
यामध्ये पाटस सात,रावणगाव तीन, केडगाव आणि कुरकुंभ प्रत्येकी एक असे १२ जण नव्याने कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत.
दरम्यान पाटस येथे मागील दोन दिवसांत तब्बल २० कोरोनाचे आढळल्याने पाटसकरांची धाकधूक वाढली आहे. दौंड शहर व यवत येथील कोवीड सेंटरचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.










