बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत काल ६९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील बारामती शहरातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून १५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
बारामतीत काल एकूण 69 स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी बावन्न जणांचा अहवाल निगेटिव आलेला असून पंधरा जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. बारामती शहरांमधील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामध्ये शहरातील स्टेशन रोड येथील ७८ वर्षीय महिला, तसेच देशपांडे ईस्टेट, हरीकृपानगर येथील ५२ वर्षांच्या महिलेचा समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.











