इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील २६ वर्षीय युवतीलाही कोरोनाची लागण झाली आहे. या युवतीने स्वत:हून तपासणी करुन घेतली. त्यामध्ये तिलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेळगाव येथील ही युवती पुण्यातील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आली होती. ही बाब लक्षात घेत तिने स्वत:हून इंदापूरमध्ये स्वत:ची तपासणी करुन घेतली. या तपासणीत तिलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या युवतीच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही लवकरच तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, या युवतीवर इंदापूरच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक कडक धोरण अवलंबण्याची गरज आहे.










