अप्पा खेडेकर : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत देऊळगाव राजे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ( २०२५- २६ ) अंतर्गत पंचायत समिती उरण ( जि. रायगड ) येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट देऊन ग्रामपंचायत व गावातील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायतीने अभियान कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.
पथकामध्ये गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील, विस्तार अधिकारी (पंचायत) विनोद मिंडे, विस्तार अधिकारी (आरोग्य) महेश काळे, विस्तार अधिकारी (कृषी) नरेश भोनकर तसेच तालुका समन्वयक हरिष आहेर यांचा समावेश होता. पथकाने ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून अभिलेख तपासणीद्वारे कामकाजाचे मूल्यमापन केले. गावातील सर्व पदाधिकारी, गावस्तरीय कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.
या अभियान कालावधीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ, विकास अधिकारी तथा प्रशासक संजय शिंदे यांनी विशेष मार्गदर्शन केल्याचे ग्रामसेवक अमिर शेख यांनी सांगितले. कार्यक्रमास माजी सरपंच अमित गिरमकर, दादासाहेब गिरमकर, पत्रकार आप्पासाहेब खेडकर, जयवंत गिरमकर तसेच गावस्तरीय विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश पवार सर यांनी केले तर आभार ग्रामपंचायत अधिकारी अमीर शेख यांनी मानले.











