कोटा : कोटा रेल मंडळातून जाणाऱ्या दिल्ली–मुंबई मार्गावरील राजधानी एक्सप्रेसला रविवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. अंतर्गत धावणारी तिरुवनंतपुरम–हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12431) या गाडीच्या दोन डब्यांना आग लागली.
ही घटना मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात कोटा–नागदा रेलखंडावर लुनी रिच्छा आणि विक्रमगड आलोट स्थानकांच्या दरम्यान घडली. सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
प्रवाशांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे….हेडलाईन तयार करुन पाहिजेत











