बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती विधानसभा पोट निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी सध्या बारामतीतील वखार महामंडळाच्या गोदामात सुरू आहे आतापर्यंत आठ फेऱ्या पूर्ण झाल्या असून त्यामध्ये सुनेत्रा पवार यांना 78 हजार 528 मते मिळाले आहेत. तर विरोधातील 23 उमेदवार आणि नोटा या सर्वांना मिळून 1425 मते मिळाली आहेत.
मतदानाचा एकंदर कल लक्षात घेता देशातील सर्वोच्च मताधिक्याचा विक्रम सुनेत्रा पवार मोडण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत देशामध्ये विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात दोन लाख 14 हजार 128 मतांची मताधिक्य ही सर्वोच्च आकडेवारी असून या निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी प्रचंड मताधिक्य देत सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून हा विक्रम मोडण्याची तयारी चालवलेली दिसते.
यावेळी सुरुवातीपासूनच देशातील सर्वोच्च मताधिक्याचा विक्रम करायचा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहायची अशा स्वरूपाची मतदारांमध्ये चर्चा सुरू होती आणि मतदानामध्ये देखील तेच दिसून आले आहे. अनेक मतदान केंद्रावर पैकीच्या पैकी मते सुनेत्रा पवार यांना मिळालेले दिसून येत आहेत.











