• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टंचाईग्रस्त गावांसाठी प्रशासन सज्ज; बारामतीत ५ गावांना टँकर मंजूर, लवकरच इतरांनाही दिलासा!

tdadmin by tdadmin
May 3, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
टंचाईग्रस्त गावांसाठी प्रशासन सज्ज; बारामतीत ५ गावांना टँकर मंजूर, लवकरच इतरांनाही दिलासा!

बारामती : महान्यूज लाईव्ह

तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना वेगाने राबविण्यात येत आहेत. बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील २१ गावांचा टंचाई जाहीर करण्याचा प्रस्ताव प्रांत अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. त्यापैकी काही गावांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून संबंधित ठिकाणी टँकर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पंचायत समितीमार्फत प्रांत कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा केल्यानंतर गाडीखेल, सोनवडी (सुपे), देऊळगाव रसाळ, थोपटेवाडी आणि अंजनगाव या पाच गावांसाठी पाणीटँकर मंजूर करण्यात आले आहेत. या गावांमध्ये उद्यापासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती तावरे यांनी दिली. तसेच कारखेल गावाचा प्रस्तावही सोमवारी मंजूर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

उर्वरित टंचाईग्रस्त गावांची पाहणी करून लवकरच तेथेही टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय इतर गावांना टंचाई घोषित करण्याचे प्रस्ताव प्रांत कार्यालयात प्रलंबित असून त्यावरही लवकर निर्णय अपेक्षित आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीमार्फत जिरायत भागातील गावांमध्ये पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याची योग्य काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

तसेच उर्वरित गावांचे प्रस्ताव तत्काळ दाखल करण्याबाबत ग्रामसेवकांना निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पुढील दोन दिवसांत तालुक्यातील जिरायत भागाचा दौरा करून पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चाऱ्याची स्थिती प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असल्याचेही सभापती किरण तावरे यांनी स्पष्ट केले.

Next Post
15 लाख रुपये खर्च आणि 11 तोळे सोने.. तरीही गर्भश्रीमंतांची पैशाची हाव मिटेना.. वैष्णवी सारखंच इंदापूरच्या शिवानीचं प्रकरण.. इंदापुरात गर्भश्रीमंतांच्या छळाला कंटाळून गर्भवती नवविवाहितेची आत्महत्या!

15 लाख रुपये खर्च आणि 11 तोळे सोने.. तरीही गर्भश्रीमंतांची पैशाची हाव मिटेना.. वैष्णवी सारखंच इंदापूरच्या शिवानीचं प्रकरण.. इंदापुरात गर्भश्रीमंतांच्या छळाला कंटाळून गर्भवती नवविवाहितेची आत्महत्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group