बारामती : महान्यूज लाईव्ह
निमा बारामतीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडत नव्या नेतृत्वाची धुरा डॉ. सौ. स्वाती आनंद वणवे यांच्या हाती देण्यात आली. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीने वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातही सक्रिय असलेल्या व्यक्तिमत्त्वाला मान्यता मिळाल्याचे चित्र दिसून आले.
लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणून बारामतीत कार्यरत असलेल्या डॉ. स्वाती वणवे या कवी व लेखिका म्हणूनही ओळखल्या जातात. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. संस्था अधिक बळकट करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध डॉ. प्रशांत जळक यांनी ‘जनरल प्रॅक्टिसमधील मानसोपचाराचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या ओघवत्या आणि खुमासदार शैलीतील व्याख्यानाला उपस्थित डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी निमा बारामतीची नवीन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. सचिवपदी डॉ. अपर्णा राठी, खजिनदारपदी डॉ. विष्णु घोलप, उपाध्यक्षपदी डॉ. सतीश देवकाते आणि डॉ. संदीप शहा यांची निवड करण्यात आली. सहसचिव म्हणून डॉ. वृशाली हारके व डॉ. श्रीकांत पवार, तर सहखजिनदारपदी डॉ. वैभव मगर यांची नियुक्ती झाली.
योग सचिवपदी डॉ. भक्ती महाजन, डॉ. निलेश महाजन आणि डॉ. हिमगौरी वडगावकर यांची निवड करण्यात आली. सांस्कृतिक सचिव म्हणून डॉ. महेश घोळवे, डॉ. रणजित कदम, डॉ. हर्षल त्रिवेदी, डॉ. सीमा बनकर, डॉ. ज्योती शिंदे, डॉ. अलका काटे, डॉ. अक्षय जांभळे आणि डॉ. वेदेही इंगळे यांना संधी देण्यात आली.
क्रीडा विभागाची जबाबदारी डॉ. श्रीनिवास बोबडे, डॉ. दिपाली टेंगळे, डॉ. मनीषा शेळके, डॉ. केशव जायभाय, डॉ. मनीषा जायभाय, डॉ. राजेंद्र पोवार आणि डॉ. मिलिंद गाढवे यांच्यावर सोपवण्यात आली. या सोहळ्यास बारामती परिसरातील अनेक डॉक्टर, मान्यवर आणि निमा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.











