गणित, माहिती तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञान व तंत्रज्ञान मध्ये राज्यात प्रथम, निकाल १०० टक्के!
बारामती : महान्यूज लाईव्ह
पुणे विभागाने घेतलेल्या एच.एस.सी. बोर्ड फेब्रुवारी २०२६ परीक्षेत शारदानगर येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयाने विज्ञान शाखेत १००% निकालाची परंपरा कायम ठेवली.
कु. सिद्धी बाबासाहेब ढवळे हिने ९३.८३% गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. तसेच गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. कु. धनश्री कालिदास कुबेर हिने ९३.१७% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला तर कु. आकांक्षा ज्ञानेश्वर नप्ते हिने ९२% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
याशिवाय, आदित्य धनराज बावधनकर आणि कु. उत्कर्षा गोरक्षनाथ नवले यांनी अनुक्रमे माहिती तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम येत महाविद्यालयाचा गौरव वाढविला.
याबरोबरच पुढील विद्यार्थ्यांनीही या निकालात उत्कृष्ट गुण मिळविले. संयुक्ता उदय काकडे ८९.८३%, साईराज किरण महाडिक ८९.५०%, यशराज विशाल शिदि-८८.८३%, राज राहूल शेरकर ८७.८३%, तन्वी कैलास होनमाने ८७.३३%, ऋतुजा सतिश पायघन व प्रांजली विनोद ढोरे- ८७%, आकांक्षा अमोल घनवट, सुरज संतोष सांगळे आणि सार्थक संजय विधाते ८६.८३%.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ सुनंदाताई पवार, संस्थेचे सीईओ श्री. निलेश नलावडे, एच. आर. गार्गी दत्ता, समन्वयक श्री. प्रशांत तनपुरे, मुख्याध्यापक श्री. सुर्यकांत मुंढे व विभागप्रमुख श्री. योगेश झणझणे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.











