विक्रम वरे, महान्यूज लाईव्ह
बारामतीत येथे आज झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या ताफ्याशी संबंधित एक प्रसंग सांगितला. भाषणादरम्यान त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या गाडीला एका व्यक्तीने कट मारला होता. हा प्रसंग घडला तेव्हा ते स्वतः गाडीत होते.
अजित पवार म्हणाले,आम्ही एका ठिकाणी जात होतो. तेव्हा अचानक एक जण आला आणि माझ्याच गाडीला कट मारून पुढे गेला. मी लगेच मागून त्याच्या गाडीचा पाठलाग केला, पण तो आम्हाला चुकवून दुसरीकडे वळला. त्यानंतर अजित पवार यांनी पोलिसांना सांगितले, त्याला पकडून आणा, बघू कोण आहे तो.पोलिसांनी तातडीने त्या व्यक्तीला पकडले.
विचारपूस केल्यानंतर त्या चालकाने सांगितले की,मी घाबरलो होतो, म्हणून गाडी पोलिसांना घाबरून थांबवली नाही.हा किस्सा सांगताना अजित पवार यांनी पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्या की, अशा प्रकारे वेडेवाकडे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर आणि रीतसर कारवाई करा. नियम मोडणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. या घटनेच्या निमित्ताने अजित पवार यांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आणि जबाबदारीने वाहन चालवण्याचे आवाहन केले.











