दौंड: महान्युज लाईव्ह
कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील मालवाहतुक वाहनचालकाचा वाहनातच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशी माहिती पाटस पोलीसांनी दिली.
अरुण मंचर धडके (रा.कोडाळ हंगरगा ता.आंळद जि.गुलबर्गा )असे या वाहनचालकाचे नाव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोल नाक्याजवळील हॉटेल गरम मसाला च्या समोर मालवाहतूक वाहन (क्रमांक.एम.एच.14/जे.एल/5821) ही वाहन उभे होते.टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी वाहनात डोकावून पाहिले असता वाहनचालक हा झोपलेल्या अवस्थेत होता. त्याला उठवले असता तो उठला नसल्याने या कर्मचाऱ्यांनी ट्रान्सपोर्ट मॅनेजर बंदीनवाज मौल्ला अत्तार यांना या वाहनचालकच्या मोबाईलवरून फोन करून कळविले. या मॅनेजरने कुरकुंभ येथे असलेल्या दुसऱ्या वाहन चालक कल्याण तुकाराम वाघे ( वय – २९, रा. कृकंटयाहळी ता.अक्कलकोट जि.सोलापुर ) यांना याबाबत कळवले असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत या वाहन चालकाला टोल नाक्याच्या रुग्णवाहिकेतून यवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच या वाहनचालाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
याबाबत कल्याण वाघे यांनी पोलीस स्टेशनला खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.