संदीप मापारी पाटील
लोणार : महान्यूज लाईव्ह
लोणार हे अ दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. शहराची लोकसंख्या ही तीस हजारापेक्षा ज्यास्त आहे. खूप मोठी बाजार पेठ असल्याने या ठिकाणी अनेक खेड्या पाड्यातील लोक हे खरेदी साठी येत असतात. परंतु शहरात दाखल होताच त्यांना जागो जागी उभ्या केलेल्या बेशिस्त वाहनाचा त्रास सहन करावा लागतो. या मध्ये तीन चाकी, चार चाकी, माल वाहतूक वाहने यांनी शहरातील सर्व रस्त्यावर व्याप वाढवला आहे. या उभ्या केलेल्या वाहना मुळे रस्ता अरुंद होतो व त्यामुळे दुसरे वाहन तिथून निघत नाही. त्यामुळे अनेक वाहन धारकांचे छोटे मोठे वाद होत असतात. त्या मुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना सुध्दा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याच बरोबर रस्त्यावरील अतिक्रमित फळ गाड्या या रस्त्याच्या मधोमध लागत असून दिवसातून दोन ते तीन वेळेस फळ गाडी व वाहनधारक यांच्यामध्ये गाडीच्या धक्क्यावरून वादविवाद होतात. वेळप्रसंगी छोट्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन एखाद्या दिवशी जातीय दंगल होऊ शकते.
या सर्व गोष्टीची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन बेशिस्त वाहन धारकावर कडक कार्यवाही करण्याची मागणी तहसीलदार लोणार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणार नगरपरिषद मुख्याधिकारी यांना लोणार शहरातील व्यापारी यांनी दिली आहे. या वेळी अनिल तेजराव मापारी, अॅड. भागवत मापारी, रोनक अली सिद्दिकी, अॅड दीपक मापारी, गोपाल मापारी, शाम जारे, बाळासाहेब आखाडे, प्रा. वसंत जनार्दन मापारी, प्रमोद चनखोरे, निखिल मापारी, शेख दादू अमजद खान, श्याम शिंदे, सुरेश बेदमुथा, अभिजीत सानप, शिवा जाधव, गजानन चाटे, प्रकाश अवसरमोल, खाजा भाई गॅरेज वाले, शेख इम्रान शेख नबी, भूषण शेषराव, मापारी दीपक, भागवत मापारी, विनायक सोनुले, सुरेश मोरे, कैलास अंभोरे, शिवाजी कोकाटे, सोपान कुलाल, राम मापारी आदी उपस्थित होते.