पुणे : महान्यूज लाईव्ह
‘ धुमधडाका ‘ चित्रपटातील अंबाक्काची भुमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज ( १ मे ) रोजी हद्यविकाराने निधन झाले.
लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. त्यांच्या अनेक चित्रपटातील संवाद आजदेखील प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. धुमधडाका, पागलपन, अर्जून देवा, कुंकु झाले वैरी , लग्नाची वरात, लंडनच्या घरात अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केले होते.
प्रेमा किरण यांनी निर्माण केलेला ‘ उतावळा नवरा ‘ हा चित्रपटही चांगलाच गाजला होता. नुकतेच त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे निधन झाल्याने त्या एकट्या पडल्या होत्या.
प्रेमा किरण यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.