मुंबई : महान्यूज लाईव्ह
किरिट सोमय्या आणि शिवसेना यांच्यामध्ये खुप दिवसांपासून शाब्दीक युध्द सुरु होते. पण काही दिवसांपूर्वी त्याला हातापायीचे रुप आले. आपल्या कारवर शिवसैनिकांनी दगडफेक केली, त्यावेळी आपल्याला मोठी जखम झाली असे सांगत आपल्याला मारण्याचा हा कट होता असा सोमय्यांचा दावा आहे.
दुसरीकडे सोमय्या त्यांच्या हनुवटीवर दाखवत असलेले रक्तच कृत्रिम असल्याचा दावा शिवसैनिक करत आहेत. याला जखम म्हणताच येणार नाही असा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे एक माथेफिरू ओठाच्या खाली टॉमॅटो सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करत असल्याचा टोला राऊत यांनी लगावला होता.
आता सोमय्यांवर उपचार करणाऱ्या भाभा हॉस्पीटलने पोलिसांना याबाबतचा वैद्यकीय अहवाल सादर केला आहे. सोमय्यांची ही जखम ०.१ सेंमीचा कट आहे. सूज किंवा रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणात नाही असा अहवाल या हॉस्पीटलने दिला आहे. या अहवालामुळे आपल्यावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या सोमय्यांचा दावा अडचणीत येऊ शकतो.