पुणे : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र राज्य एमएड प्राथमिक शिक्षक कृती समितीच्या पुणे जिल्हा कृती समितीच्या अध्यक्षपदी इंदापूर येथील शहाजी म्हेत्रे यांची रविवारी निवड झाली.
रविवार दि. २७ मार्च रोजी खेड तालुक्यातील खराबवाडी येथे महाराष्ट्र राज्य एमएम प्राथमिक शिक्षक कृती समितीची बैठक झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष राजू जाधव व विभागीय अध्यक्ष भीमराव पाटील हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा कृती समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली.
यामध्ये अध्यक्ष म्हणून इंदापूर तालुक्यातील शहाजी म्हेत्रे , सरचिटणीस मावळ तालुक्यातील आण्णासाहेब ओहोळ , कार्याध्यक्ष जुन्नर तालुक्यातील दिनेश मेहेर,कोषाध्यक्ष म्हणून खेड तालुक्यातील रामचंद्र शिंगाडे, तर सल्लागार म्हणून शैलेश चिखले सर ( आंबेगाव ), भारत इंदलकर ( हवेली ), सुनिल भोसले ( इंदापूर ) यांची निवड करण्यात आली. प्रसिद्धीप्रमुख म्हणून मुळशी तालुक्यातील परमेश्वर जाधव यांची तर संपर्कप्रमुख म्हणून शिरुर तालुक्यातील सोन्या बापू कर्पे यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष म्हणून नितीन मेमाणे (भोर/पुरंदर), अशोक कदम (दौंड), गजानन गाढवे ( बारामती ), भाऊसाहेब उचाळे ( शिरुर ), बापूराव पवार( मुळशी ) यांची निवड करण्यात आली तसेच महिला कार्यकारिणीत शोभा डुंबरे मॕडम ( जुन्नर ), पुष्पलता गायकवाड मॕडम ( हवेली ) ,संध्या गायकवाड ( खेड ), मंदाकिनी तासगावकर ( भोर ), स्नेहल काकडे ( वेल्हा ), अर्चना माने ( हवेली ), साधना घाटकर ( खेड ),आशा सकट ( हवेली ) यांची निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शहाजी म्हेत्रे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, जिल्ह्यातील सर्व एम एड प्राथमिक शिक्षकांचे संघटन करुन राज्य कार्यकारिणीस सर्वतोपरी सहकार्य केले जाईल व उच्चशिक्षित एमएड प्राथमिक शिक्षकांचा लढा आपल्या न्याय हक्कासाठी चालू ठेवला जाईल असे त्यांनी सागितले तसेच आपल्या पुणे जिल्ह्यातील तालुका स्तरावर कार्यकारिणी तयार करण्याचे काम सुरू आहे.. राज्य पातळीवर आपल्या न्याय्य हक्कांसाठी आपल्या राज्य कृती समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी राज्यव्यापी दौरे करत असून विद्यमान आमदार, खासदार, मंत्री, मंत्रालयातील सचिव यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. त्यांच्या लढ्याला पाठबळ मिळावे म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या बरोबरीने सामिल होणं हीच काळाची गरज आहे. निश्चितपणे या लढ्याच्या माध्यमातून शेकडो शिक्षकांना अधिकारी होण्याची सुवर्ण संधी लाभणार आहे.तरी कृपया पुढे या. आपल्या स्वतःच्या उज्वल भविष्यासाठी आजच कृती समितीत सामिल व्हा,असे त्यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना आवाहन केले
यावेळी राज्याध्यक्ष राजू जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, उच्च शिक्षित प्राथमिक शिक्षकातून जर शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तारअधिकारी, केंद्रप्रमुख ही पदे भरली तर त्याचा लाभ शालेय शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास नक्कीच होईल व हे शासनास पटवून देता आले पाहिजे म्हणून सर्व एम एड प्राथमिक शिक्षकांनी एकजुटीने लढा देणे गरजेचे आहे.
शेवटी आभार विभागीय अध्यक्ष भिमराव पाटील यांनी मानले