महान्यूज लाईव्ह टीम
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी केल्याप्रकरणी भाजपचे महाराष्ट्र सोशल मिडिया प्रभारी जितेन गजरिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जितेन गजरिया यांनी रश्मी ठाकरेंबाबत आक्षेपार्ह व्टिट केल्याची तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
जितेन गजारिया यांच्या वकिलांनी मात्र त्यांच्या व्टिटचे पूर्णपणे समर्थन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत म्हणून व्टिट करता कामा नये, असा कायदा नाही. हे व्टिट अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याच्या चौकटीत राहून केलेले आहे, असेही या वकिलांनी म्हणले आहे.
जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्याविषयी एक व्टिट केले होते. या व्टिटमध्ये गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांना ‘ मराठी राबडीदेवी ‘ असे म्हणले आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे.