महान्यूज लाईव्ह टीम
आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेला गोंधळ आणि दलालांच्या फिरणाऱ्या ऑडिओ क्लिपबाबतची सगळी पाळेमुळे शोधून काढू आणि त्यात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला असता चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यावर परीक्षा पुन्हा घ्यायच्या का याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, त्यांच्याकडून पुन्हा परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही तसेच १०० टक्के पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेतली जाईल, असे राजेश टोपे म्हणाले.
न्यासा कम्युनिकेशनला त्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर, त्यांचे गुण तपासून परवानगी देण्यात आली होती. या परीक्षेमधील ‘अ’ आणि ‘ब’ गटातील परीक्षेत कोणताही दोष आढळून आलेला नाही. तर ‘क’ आणि ‘ड’ गटातील परीक्षेत झालेल्या गैरकारभाराबाबत स्वतः आरोग्य विभागाने एफआयआर दाखल केला आह