सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : भरदिवसा दुपारच्या वेळी घरफोडी करत अज्ञात चोरट्याने घरातील बेडरूममधील सात तोळे सोने व एक लाख रुपयांवर डल्ला मारला. अज्ञात चोरट्याने केलेल्या हात सफाई मध्ये दागिने व रोख रक्कम मिळून असा असा एकूण 3 लाख 61 हजार 401 रुपयांची धाडसी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ही धाडसी घरफोडी शनिवारी (दिनांक 18) रोजी भर दुपारी पावणे एक ते पावणे तीन वाजण्याच्या दरम्यान रामवाडी (पो. वडापुरी ता. इंदापूर) येथे घडली. याबाबत सुरज विलास कोरटकर (रा.रामवाडी पो.वडापुरी) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादी सुरज कोरटकर यांच्या घरात शनिवारी (दिनांक 18 रोजी) प्रवेश करून घरातील बेडरूम मधील रोख एक लाख रुपये, तसेच सोन्याचे गंठण, व एक मिनी गठण, एक सोन्याचा कानातील वेल, एक अंगठी, एक जोड़ कानातील मुंबे व एक जोड कानातील टॉप्स व काळे मन्यातील सोन्याचे डोरले असा एकूण तीन लाख 61 हजार चारशे एक रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक लिगाडे करत आहेत.