महान्यूज टीम
राज्याच्या आरोग्य खात्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मतानूसार जानेवारीमध्ये महाराष्ट्रात ओमीक्रॉन कोरानाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. जगभरात हा विषाणू पसरत आहे. महाराष्ट्राच्या शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही रुग्ण सापडत आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत ३४ रुग्ण सापडलेले आहेत. देशात सापडलेल्या ७३ रुग्णांपैकी निम्म्याहून जास्त रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.
चिंतेची बाब ही आहे की उस्मानाबाद, बुलढाणा, सातारा यासारख्या भागातून रुग्ण सापडत आहे. याचा अर्थ असा आहे की ओमीक्रॉन महाराष्ट्राच्या सर्व भागात पसरला आहे.
यातील दिलासा देणारी गोष्ट एवढीच आहे की, आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांपैकी २५ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलेले आहे.
जगभरातील ७७ देशात ओमीक्रॉन पसरल्याची माहिती आहे. विषाणूचा प्रसार होण्याचा हा सगळ्यात जास्त वेग असल्याचेही सांगितले जात आहे.
या सगळ्या बाबींचा विचार करता महाराष्ट्रातील जनतेने ओमीक्रॉन कोरोनाला हलक्यात घेण्याची चुक करू नये. सार्वजनिक ठिकाणी वावरताना योग्य ती काळजी घ्यावी, असे सर्व तज्ञांचे म्हणणे आहे.