पुणे : महान्यूज लाईव्ह
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव प्रतापराव गोडसे यांचे आज ( सोमवार) सायंकाळी ६.४५ वा. निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. यकृताच्या कर्करोगासंदर्भात त्यांच्यावर मागील दोन आठवड्यापासून ससून रुग्णालयात उपचार सूरु होते.
ट्रस्टच्या माध्यमातून ते ५० वर्षाहून जास्त कार्यरत होते. २०१० पासून ते अध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले.