पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत फायरींग करून एकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव समीर शेख असून तो कॉंग्रेसचा कार्यकर्ता होता.
चौकीच्या अगदी जवळच बेछुट गोळीबार झाला असून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अगदी जवळून ६ गोळ्या झाडल्या आहेत. रोहीत वडेवाडे जवळील चंद्रभागा वाईन्सच्या समोर ही घटना घडली.
आज ( सोमवारी ) दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला आहे.