महान्यूज लाईव्ह
उत्तर प्रदेशमधील एक रिक्षावाला सध्या मोठ्या अडचणीत आला आहे. त्याला प्राप्तीकर विभागाकडून ३ कोटीचा कर भरण्यासाठी नोटीस आली आहे.
उत्तर प्रदेशमधील बागलपूरमधील अमर कॉलनी येथील रहिवासी असलेल्या प्रताप सिंग हे रिक्षा चालविण्याचे काम करतात. त्यांना १९ ऑक्टोबर रोजी प्राप्तीकर खात्याकडून फोन आला आणि त्यांना रु.३,४७,५४,८९६ ऐवढी रक्कम भरण्याची नोटीस पाठवण्यात आली. या प्रकाराने हादरलेल्या प्रताप सिंग यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन सारा प्रकार सांगितला. यावर अजून तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी पोलिस साऱ्या प्रकरणाचा तपास करत आहेत.
यावर्षीच्या १५ मार्चला सिंग यांनी पॅन कार्ड मिळण्यासाठी अर्ज केला होता. अचानकपणे त्यांना संजय सिंग यांच्या मोबाईलवरुन पॅनकार्डची रंगीत कॉपी पाठविण्यात आली. ही पॅनकार्डची मूळ प्रत नाही हे काही अशिक्षित असलेल्या प्रताप सिंग यांच्या लक्षात आले नाही.
त्याला फोन केलेल्या प्रात्पीकर अधिकाऱ्यांनी त्याला सांगितले की त्याचा पॅन नंबर वापरून कोणीतरी त्याच्या नावाने जीएसटी नंबर तयार केला आहे. त्या नंबरवरून २०१८ – १९ मध्ये रु.४३,४४,३६,२०१ चा व्यवहार झाला आहे.
आता प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी त्याला याबाबत तक्रार देण्यास सांगितले आहे.