बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील अंधश्रद्धाविरोधी निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या मनोहर भोसले व सहआरोपी ओंकार शिंदे याला आज बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.
मनोहर भोसले आणि ओंकार शिंदे यांच्या जामीन अर्जावर आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस टी भालेराव यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये अॅड. रोहित गायकवाड, हेमंत नरूटे व रणजित गावडे यांनी मनोहर भोसले व ओंकार शिंदे या दोघांच्या जामीनासंदर्भात युक्तिवाद केला.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मनोहर भोसले याला 60 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला, तर ओंकार शिंदे यांना तीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.