• Contact us
  • About us
Monday, May 11, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोनं नको, पेट्रोलही जपून वापरा, लग्नं देशातच करा! निवडणुका संपताच मोदींचं ‘कडक उपदेश पॅकेज’! पण विरोधकांचा टोला, आधी मतं, आता बचतीचा धडा!

tdadmin by tdadmin
May 11, 2026
in संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
सोनं नको, पेट्रोलही जपून वापरा, लग्नं देशातच करा! निवडणुका संपताच मोदींचं ‘कडक उपदेश पॅकेज’! पण विरोधकांचा टोला, आधी मतं, आता बचतीचा धडा!

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसरीचा नवा मंत्र दिला आहे. “पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, परदेशी प्रवास टाळा,” अशा तब्बल नऊ सूचनांचा वर्षाव मोदींनी हैदराबादमधील सभेतून केला.

आखाती युद्ध, वाढते तेलाचे दर आणि डॉलरवरील दबाव या पार्श्वभूमीवर मोदींनी हे आवाहन केल्याचं सांगितलं. मात्र, निवडणुका संपेपर्यंत सरकार शांत का होतं? असा उपरोधिक सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. “मतदान होईपर्यंत ‘अच्छे दिन’, मतदानानंतर ‘कमी खर्चाचे दिन’ सुरू झाले का?” असा टोला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोदींच्या या 9 सूचनांनी देशवासीयांची ‘लाईफस्टाईल’च बदलणार?
पंतप्रधानांनी नागरिकांना केलेल्या प्रमुख सूचना अशा –
पेट्रोल-डिझेल जपून वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, एक वर्ष सोनं खरेदी करू नका, परदेशी प्रवास टाळा, जास्तीत जास्त मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन बैठका वाढवा. परकीय वस्तूंची खरेदी कमी करा, डॉलरची बचत करा, सेंद्रिय खतांचा वापर वाढवा

या सूचनांनंतर सामान्य नागरिकांमध्येही चर्चांना उधाण आलं आहे. “आधी ‘सबका साथ’, आता ‘सबकी बचत’,” अशी मिश्कील प्रतिक्रिया काहींनी दिली. तर “सोनं घेऊ नका म्हणणाऱ्या सरकारने आधी पेट्रोल 100 च्या खाली आणावं,” अशी मागणी विरोधकांनी केली.

मोदींनी परदेशातील डेस्टिनेशन वेडिंग टाळण्याचं आवाहन करताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. सामान्य माणूस आधीच गावातल्या मंगल कार्यालयात लग्न करतो, हा सल्ला नेमका कोणासाठी? असा प्रश्न नेटिझन्स विचारताना दिसले. काहींनी तर  आता लग्नाचं कार्डही डिजिटल करा, कारण कागदही आयातीत असू शकतो, असा उपहासात्मक सल्ला देत सरकारवर निशाणा साधला.

सरकारचं स्पष्टीकरण – ही काळाची गरज
भाजप नेत्यांनी मात्र मोदींच्या आवाहनाचं समर्थन केलं आहे. आखाती संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून भारताने आतापासूनच बचतीचा मार्ग स्वीकारणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मात्र विरोधकांचा आरोप वेगळाच आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्यानंतर आता सरकार नागरिकांनाच काटकसरीचे धडे देत आहे, असा आरोप काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केला आहे. दरम्यान, मोदींच्या या आवाहनानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न फिरतोय, आता पुढचं आवाहन काय असेल? विकेंडला बाहेरचं खाणं बंद करा?

Next Post
मध्यपूर्वेतील युद्धाचा धूर; शेतकऱ्यांच्या खिशाला लागला महागाईचा सूर!

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घडामोड; कर्जमाफीचा निर्णय या महिनाअखेर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group