मुंबई : महान्यूज लाईव्ह
आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेता इरफान खान यांचे आज बुधवारी निधन झाले. मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर इरफान खान भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात इरफान खान यांच्यावर उपचार करण्यात आले होते. ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन इरफान खान यांचा गौरव करण्यात आला होता.










